Sarvottam Marathi jokes; khatarnak jokes, hindi jokes, funny marathi jokes

मराठीचा पेपर असतो. परीक्षेत प्रश्न असतो,
'विरुद्धार्थी शब्द लिहा' आणि शब्द
असतो 'सात्विक' . बंडू खूप विचार
करतो आणि उत्तर लिहितो 'सात स्ट्रॉंग'
परीक्षा संपल्यावर मुले बाहेर येतात. बंडू
चंदूला विचारतो, 'चंदू
सात्विकच्या विरुद्धार्थी शब्द काय
लिहिलास रे?'
चंदू उत्तर देतो, 'सात खरेदी कर.'
बंडू म्हणतो, 'आयला होय रे, माझ्या लक्षातच
आले नाही. तरीच मी विचार करत
होतो मराठीच्या पेपरमध्ये
इंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द
कसा काय विचारला.'
=======================================================================
आयुष्यं हे बदलतं असतं !...
शाळेपासून कॉलेजपर्यंत..
चाळीपासून फ्लँटपर्यंत....
पुस्तकापासून फाईलपर्यंत ..
जीन्सपासून फॉर्मलपर्यंत ..
पॉकेटमनीपासून पगारापर्यंत ..
प्रेयसीपासून पत्नीपर्यंत ..
लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत......
पण,
पण,
मित्र मात्र तसेच राहतात....
.
.
.
प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव देणारे..
माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला,
माझा मानाचा मुजरा !!

=======================================================================
गुरूजी - सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं ते सांगा.  बंड्या तू सांग बरं.
बंड्या - मला कविता आवडते.
गुरूजी - वा वा. कोणती कविता आवडते?
बंड्या - ती तिस-या बाकावरची.

बाबा - चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ. तिला नव्वद टक्के मिळाले आहेत.
चंप्या - तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो.

बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते...
नवरा : काय सांगतेस... तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?
बायको : हो.
नवरा : अरे देवा... आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो...

=======================================================================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा