पुणेरी काटकसर

बंड्याला काटकसरीचे महत्त्व कळावे म्हणून त्याचे वडील त्याला सदाशिव पेठेत राहणाऱ्या लेल्यांकडे पाठवतात.
वयस्कर लेल्याना बंड्या काटकसरीने कसे रहावे असे विचारतो.
लेले म्हणतात, " अरे आता हे बघ, माझे हे जे धोतर आहे ना ते मी गेली २० वर्षे
वापरतोय, अजून ५ वर्षाने ते पूर्ण फाटेल, मग मी त्याची गोधडी करीन.
मग ती गोधडी फाटली कि त्याची लंगोट करीन, मग ती लंगोट फाटली कि त्याचे पाय-पुसणं करीन,
मग ते पाय-पुसणं वापरून वापरून फाटलं कि मग त्याचे दोरे काढून त्यांच्या वाती वळीन आणि पणती मध्ये लावीन,
मग त्या वाती जाळल्या कि त्याची जी राख उरेल त्या राखेने दात घासेन."

बंड्यासुद्धा आता जॉकीच्या राखेने दात घासू लागलाय!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा