लेटेस्ट पुणेरी किस्सा
जोशी : मी इथले टॉयलेट वापरू का?
नेने : हो, पण पैसे पडतील
जोशी : नाही पडणार, बसताना काळजी घेईन मी
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣
पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या ना
पाहुणा : नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत
पुणेकर : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय??
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣
मुलगा : चाहूंगा मॆ तुझे सांज सवरे
मुलगी : आणि दुपारचे काय?
मुलगा : १ ते ४ विश्रांती. मी पुण्याचा आहे
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣
भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना
पुणेकर : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी : हा आहे साहेब
पुणेकर : आधी ते खर्च कर
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣
पुण्यातील एक खवचट म्हातारा एकदा दातांच्या डॉक्टरांकडे गेला. त्या खुर्चीत बसल्यावर डॉक्टरांनी त्यांना मोठा आ आ आ करायला सांगितले. कितीही मोठा केला तरी ते आजून मोठा करायला सांगायचे.
म्हातारा म्हणाला, “तोंडात बसून काढणार असाल तर ती पायातली चप्पल आधी काढा”
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣
स्वारगेट वर मुंबईची मुलगी आपल्या कॉलेज स्टाईल मध्ये तुच्छतेने कंन्डक्टरला विचारते : हे डबडं केव्हा हलणार इथून?
कंन्डक्टर (अदबीने, सस्मित) : कचरा भरल्यानंतर लगेचच !
तात्पर्य : महामंडळाच्या कंन्डक्टरचा नाद करू नये
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣
पुणेकर : काका पावशेर रताळे द्या
दुकानदार : पिशवीत देऊ?
पुणेकर : नाही नाही… पेन ड्राईव्ह आणलाय. त्यात “रताळे” नावाचा फोल्डर बनवा आणि टाका त्यात
🤣🤣🤣😃😃😃😃
😂😂😂😂😂
वडील: उद्या रिझल्ट आहे ना रे?
मुलगा: हो...
वडील: जर कां नापास झालास, तर तुझा माझा संबंध संपला.
*दुसऱ्या दिवशी*
वडील: काय झाला रे रिझल्ट?
मुलगा: तूं कोण रे मला विचारणारा? 😡😃😂😂😂😂😂