1 आधी गुंतू नये, आणि गुंतल्यावर कुंथू नये.
2 आमंत्रण दिले साऱ्या गावा, वादळ सुटले घरीच जेवा.
3. आवडीने केला नवरा ,त्याच्या पायाला भवरा.
4 कशी मागावी भिक, तर तंबाखू मागायला शीक.
5. का गं बाई रोड, तर म्हणे माहेरची ओढ.
6. घटकेची फुरसत नाही, अन कवडीची मिळकत नाही.
7. जावा तिथे दावा, सवती तिथे हेवा.
8. जो बायकोशी भला, तो खायी दहिकाला.
9. दिवसभर चरते , म्हणे मी एकादशी करते.
10. नाका पर्यंत पदर, अन वेशी पर्यंत नजर.
11. नाव सगुणी ,करणी अवगुणी.
12. प्रसंग पडे बाका, तो गधेको कहो काका.
13. फुकटचे खाय, त्याला स्वस्त काय नी महाग काय.
14. बसे तो फसे, फिरे तो चरे.
15 बढाईला पुढे , लढाईला मागे.
16. बारा पोरांची माय, खाटल्यावर जिव जाय.
17. बोलण्यात जोर, कामात अंगचोर.
18 मूर्ख भांडती, वकील बंगले बांधती.
19 म्हातारी मेली हिवाळ्यात, रडू आल पावसाळ्यात.
20. लाज ना अबरू, कशाला घाबरू.
21 वेळ ना वखत, आन कुत्र चालल भुकत.
22. सोळा हात लुगड ,तरी अर्ध तंगड उघड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा