नमस्कार मित्रांनो.
आजच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळ्याचे चार क्षण सापडणे या सारखं दुसरं भाग्य नाही आणि असे क्षण आपल्या आयुष्यात निर्माण करण्यामध्ये माझा खारीचा वाटा असावा म्हणून हा ब्लॉग प्रपंच.
या ब्लॉग वर मला आवडलेले मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेतील विनोद आणि विनोदी किस्से अत्यंत गंभीरपणे पोस्ट केले जातील.
हे विनोद आणि किस्से वाचून आपणास खूप हसू आले आणि त्या भरात आपल्या हातातील मोबाईल खाली पडल्यास आणि त्याची स्क्रिन फुटल्यास लेखक जबाबदार नाही. अर्थात अशी शक्यता फारच कमी आहे कारण माझे किस्से ऐकून कोणाला हसू येईल असं माझ्या बायकोला अजिबात वाटत नाही.
निंदकाचे घर असावे शेजारी असे संत तुकारामांनी (चू.भु.द्या.घ्या. पक्षी: cbdg) म्हंटले आहे. पण आधुनिक युगात सगळे निंदक आपल्या जोडीदाराच्या रूपाने घरोघरी आले तर काय करायचे हे मात्र कोणीही सांगितले नाही.
याउपर कोणाला आलेच हसू तर नक्की प्रतिक्रिया दयावी. टाळाटाळ करू नये आणि प्रतिक्रिया द्यायला होत नसेल तर केळी खावीत. कारण संतांनी म्हंटलेच आहे की, "केळ्याने होत आहे रे, आधी केळेची पाहिजे"
-अनिरुद्ध

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा