मराठी विनोद -सरकारी कर्मचा-याची कथा

एकदा एका सरकारी कर्मचा-याची promotion ऑर्डर  एका विहिरीत पडते...  तेव्हा  तो विहिरीजवळ  रडत बसलेला असतो .. 😭😭😭
Read latest Marathi jokes at
Https://manachejokes.blogspot.com

तेव्हा  विहिरी तून  एक देवी प्रकट होते...!!
ती देवी त्या कर्मचा-याला विचारते...
 काय झालं ..??
 तेव्हा  तो देवीला सांगतो  की माझी  ऑर्डर  विहिरीत  पडलेली आहे ...

 तेव्हा, ती देवी विहिरीतून *निवडणूक ड्युटीची ऑर्डर*  काढते ...
तेव्हा  तो कर्मचारी प्रामाणिकपणे सांगतो .. ही ऑर्डर  माझी नाही ..!!

 तेव्हा  देवी दुसरी *एमपीएससी परिक्षा ड्युटीची ऑर्डरचा कागद*  काढते ...!!

परत कर्मचारी प्रामाणिकपणे सांगतो ... ही पण ऑर्डर  माझी नाही ..!!

देवी परत विहिरीतून  *emmergency duty order* काढते.. !!
 परत कर्मचारी प्रामाणिकपणे ही पण ऑर्डर  माझी  नाही असे सांगतो ....
तेव्हा , देवी परत *निवडणुक प्रोटोकाॅल कामाची ऑर्डर* काढते ...
परत कर्मचारी प्रामाणिकपणे ही पण ऑर्डर  माझी नाही असे सांगतो ....


शेवटी  ....!!
देवी त्या कर्मचा-याची promotion ची ऑर्डर  काढते तेव्हा कर्मचारी आनंदाने  म्हणतो हीच  माझी  ऑर्डर  आहे ....☺😊

 त्याचा हाच प्रामाणिक  पणा पाहून , देवी त्या  त्याच्यावर खुश होऊन  वरील सर्व ऑर्डरी ...  कर्मचा-याला देवून टाकते ..
तेव्हा पासून सरकारी कर्मचारी वरील सर्व  आॕर्डरप्रमाणे इमाने इतबारे कामे करतोय....

सर्व सरकारी कर्मचा-यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 👍👍👍👍👍👍👍
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा