न्यायालयात वकील एका डॉक्टरांना प्रश्न विचारत असतात.
Read marathi jokes on HTTPS://manache jokes.blogspot.com
व.- महोदय, तुम्हीच ह्या शवाचे विच्छेदन केले?
डॉ.- होय.
व.- विच्छेदन करण्याआधी खात्री करावी लागते की शवात खरंच प्राण नाहीत. बरोबर?
डॉ- अर्थातच. होय.
व.- तुम्ही तशी खात्री करून घेतली होती का?
डॉ.- गरज नव्हती.
व.- असे का?
डॉ.- त्या व्यक्तीची कवटी अर्धी चिरली गेलेली असून तिचा मेंदू माझ्या टेबलवर एका बरणीत होता.
व.- ते काहीही असलं तरी तुम्ही ती व्यक्ती जिवंत नसल्याची खात्री केली नाहीत. म्हणजे ते शव नसून जिवंत व्यक्ती असण्याची शक्यता नव्हतीच असं तुम्ही शपथेवर म्हणू शकाल?
न्यायाधीश, स्टेनो, शिपाई, बाकी लोक इ. हसू लागतात. विनोद इथे संपलेला नाहीये!
डॉ.- होय साहेब, चुकलंच. ती व्यक्ती जाऊन कुठेतरी वकील झाली असू शकेल हे ध्यानातच नव्हतं माझ्या!
Read marathi jokes on HTTPS://manache jokes.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा