बेचाळीसाव्या वाढदिवसा निम्मित सुचलेली कविता

सुरू झालाय मित्रांनो आता
बेचाळीसचा लढा।।धृ।।

केला हिशेब व्यवहारांचा
बाकी मात्र शून्य आहे
अर्धी उमेद संपून गेलीय
अर्धी अजून शिल्लक आहे
आयुष्याच्या मध्यावरती अजून
शिकतोय जगण्याचा धडा।।1।।

किती शिकलो धडे
बोध काही घेतला नाही
पुढच्यास ठेच लागल्या तरी
मागचा शहाणा होतं नाही
प्रत्येकाची स्वतंत्र ठेच आणि
शहाणपणाचा पालथा घडा ।।2।।

नवे काही सुचत नाही
चाकोरीत मन रमत नाही
पदरात माप पडत नाही
आणि कळतं की आपल्यावाचून कुणाचं काही अडत नाही
कस निभावून न्यायचं आता या चिंतेमध्ये कुढा ।।3।।

होईल काही साक्षात्कार
करून दाखवू चमत्कार
प्रतिभेला फुटतील कोंब
यशाचे उघडेल महाद्वार
उदासनतेची मरगळ झटकून
पुन्हा नव्याने करूया आता
जग जिंकण्याचा प्रयत्न वेडा
उचल पैजेचा विडा (स्वतःशी पैज)
सुरू झालाय मित्रांनो आता
बेचाळीसचा लढा।।4।।
।।समाप्त।।

कवी - अनिरुद्ध गावडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा