मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मराठी कविता - डिप्रेशनचे औषध



माणूस काय करतो ?

कुढतो जास्त ,
अन रडतो कमी !
म्हणून त्याचं हृदय ,
धडधडत असतं नेहमी !

                बोलणं कमी झाल्यामुळे ,
                   प्रश्न निर्माण झालेत !
                     सारं काही असूनही ,
                    एकलकोंडे  झालेत !

भावनांचा कोंडमारा ,
होऊ देऊ नका !
हसणं आणि रडणं ,
दाबून ठेऊ नका !

                आपल्या माणसांजवळ ,
                    व्यक्त झालं पाहिजे !
                   खरं खरं दुःख सांगून ,
                   मोकळं रडलं पाहिजे !

हसण्याने , रडण्याने ,
दबाव होतो कमी !
भावनांचा निचरा ,
ही Fresh होण्याची हमी !

             कुणाशी तरी बोला म्हणजे ,
                  हलकं हलकं वाटेल !
                 दुःख जरी असलं तरी ,
                   मस्त जगावं वाटेल !

येऊद्यानं कंठ दाटून ,
काय फरक पडतो  ?
आपल्या माणसाजवळच,
गळ्यात पडून रडतो !

            आपली माणसं , आपली माणसं,
              बाजारात मिळत नसतात !
                 नाती-गोती जपून ती ,
               निर्माण करावी लागतात !

भौतिक साधनं जमवू नका ,
आपली माणसं जमवा !
नाहीतर तुम्ही गरीब आहात ,
कितीही संपत्ती कमवा !

                 हाय , हॅलो चे मित्र बाबा ,
                  काही कामाचे नसतात !
                   तुझी पाठ वळली की ,
                     कुत्सितपणे हसतात !

हसण्यासाठी , रडण्यासाठी ,
माणसं जपून ठेव !
नाहीतर मग घरात एखादा ,
" रोबोट "तरी  आणून ठेव !

              रोबोटच्याच गळ्यात पडून ,
                   हसत जा , रडत जा !
                  शांत झोप येण्यासाठी ,
                  दररोज गोळ्या घेत जा !

दुःख उरात दाबून वेड्या ,
झोप येत नसते !
हसत खेळत जगण्यासाठी
माणसांचीच गरज असते ,

                   इथून पुढे भिशी कर ,
              हसण्याची अन रडण्याची !
               हीच खरी औषधं आहेत ,
            डिप्रेशनच्या बाहेर पडण्याची !!

         ...... कवी .....             
     *डॉ. Ratnakar kendre*     
      एम डी मानसोपचारतज्ज्ञ

नवऱ्यावर कविता

विवाहित पूरूषांचे कधीही प्रगट न होणारे अंतर्मन सुंदर शब्दांत गुंफलेले एक सुंदर काव्य. प्रत्येक विवाहित स्त्रीने आणि शक्य झाल्यास त्याच्या मुला / मुलिंनी देखील जरूर वाचावे.
👇🏼
||आता पर्यंत बायको वरील कविता ऐकली असेल व वाचली असेल पण नवऱ्या वरील एकदा वाचा ||

नवरा म्हणजे समुद्राचा
भरभक्कम काठ
संसारात उभा राहतो
पाय रोवून ताठ      ll

कितीही येवो प्रपंचात
दुःखाच्या लाटा
तो मात्र शोधीत राहतो
सुखाच्या वाटा   ll

सर्वांच्या कल्याणा करता
पोटतिडकीने बोलत राहतो
न पेलणारं ओझं सुद्धा
डोक्यावर घेऊन चालत राहतो  ll

कधी कधी बायकोलाही
त्याचं दुःख कळत नसतं
आतल्या आत त्याचं मन
मशाली सारखं जळत असतं  ll

नवरा आपल्या दुःखाचं
कधीच प्रदर्शन मांडत नाही
खूप काही बोलावसं वाटतं
पण कुणाला सांगत नाही   ll

बायकोचं मन हळवं आहे
याची नवऱ्याला जाणीव असते
दुःख समजून न घेण्याची
अनेक बायकात उणीव असते  ll

सारं काही कळत असून
नवऱ्याला अपमान गिळावे लागतात
वेदनांना काळजात दाबून
पुन्हा कष्ट उपसावे लागतात    ll

सगळ्यांच्या आवडी जपता जपता
मन मारीत जगत असतो
बायको , पोरं खूष होताच
तो सुखी होत असतो  ll

इकडे आड तिकडे विहीर
तशीच बायको आणि आई
वाट्टेल तसा त्रास देतात
कुणालाच माया येत नाही ll

त्याने थोडी हौसमौज केली तर
धुसफूस धुसफूस करू नका
नवऱ्या विरुद्ध विनाकारण
दारू गोळा भरू नका  ll

दोस्ता जवळ आपलं मन
त्यालाही मोकळं करावं वाटतं
हातात हात घेऊन कधी
जोर जोरात रडावं वाटतं ll

समजू नका नवरा म्हणजे
नर्मदेचा गोटा आहे
पुरुषाला काळीज नसतं
हा सिद्धांत खोटा आहे  ll

मी म्हणून टिकले इथं
दुसरी पळून गेली असती
बायकोनं विनाकारण
नवऱ्याला धमकी दिलेली असती ll

घरात तुमचं लक्षच नाही
हा एक उगीच आरोप असतो
बाहेर डरकाळ्या फोडणारा
घरी म्यांव म्यांव करीत बसतो ll

सारख्या सारख्या किरकिरीनं
त्याचं डोकं बधिर होतं
तडका फडकी बाहेर जाण्यास
खूप खूप अधीर होतं  ll

घरी जायचं असं म्हणताच
त्याच्या पोटात गोळा येतो
घरात जाऊन बसल्या बसल्या
तोंडात आपोआप बोळा येतो ll

नवरा म्हणा , वडील म्हणा
कधी कुणाला कळतात का ?
त्यांच्या साठी कधी तरी
कुणाची आसवं गळतात का ? ll

पेला भर पाणी सुद्धा
चटकन कुणी देत नाही
कितीही पाय दुखले तरी
मनावर कुणी घेत नाही  ll

वेदनांना कुशीत घेऊन
ओठ शिउन ' तो ' पडून राहतो
सर्वांच्या सुखासाठी
एकतारी भजन गातो  ll

बायको आणि मुलांनी
या संताला समजून घ्यावं
फार काही नकोय त्याला
दोन थेंब सुख द्यावं    ll

मग बघा लढण्यासाठी
त्याला किती बळ येतं
नवऱ्याचं मोठेपण हे
किती जणांच्या लक्षात येतं ? ll

        🙏🏻 माझ्या सर्व विवाहित मित्रांसाठी समर्पित 🙏

मराठी कविता - मिसळपाव

मिसळपाव

बशीतल्या पावाला
मिसळ म्हणाली लाजून,
असा दूर का उभा तू
मी तुझ्यासाठी बसले सजून.

पाव म्हणाला दुःखी होऊन
तू तर तिखटजाळ,
सांग कशी जुळायची
तुझी आणि माझी नाळ?

मी असा पांढरा फटक
तू किती छान सजली,
गालावरती ग तुझ्या
टोमॅटोची लाली!

कोथिंबीरीचा हिरवा शालू
नवरी छान लाजली,
दंडात रुतली गं तुझ्या
कांद्याची लाल चोळी!

मिसळ म्हणे पावराजा
असं काही नसतं,
एकदा प्रेम झालं की,
ते कोणावरही बरसतं!

तू किती साधा अन
तू किती सिंम्पल,
तूच माझा पाव अन
मी तुझी सँम्पल!!

पाव म्हणाला मिसळीला
आता आपलं एकच गांव,
तुला मला एकच नांव
मिसळपाव मिसळपाव!!

💦सगळ्या मिसळपाव प्रेमींना खास पावसाळ्यात💦
~ मुळ कवी अनामिक
🙏😀