आय डी दाखवा

 अंमली पदार्थ विरोधी पथकाचा ऑफिसर पाटलाच्या शेतात आला.

 

"तू ड्रगची अवैध शेती करतोय म्हणे. मला तपासणी करायचीय ..

त्याने गुर्मीत विचारलं..


पाटिल म्हंला.."तसं काय नाय ओ साहेब... तुमी पायजे तर तपासून बघा..पन एक करा शेताच्या त्या कोप-यात जाऊ नका".


आॅफिसर भडकून म्हणाला..."तू कोण मला सांगणार रे दिडशाण्या...माझ्या कडे ऑथोरिटी लेटर आहे"


 त्याने खिशातनं आयडी काढलं...


"बघितलं? या आयडीचा अर्थ असा की, मी पाहिजे तिथे जाउ शकतो..कुणाच्याही जमिनीत घुसू शकतो. कोणाच्या बापाची हिम्मत नाय मला अडवायची..कळलं?


 पाटलानि निमुट मान हलवली.


साहेब शेतात गेला.


थोड्याच वेळात एक मोठी किंकाळी शेतात घुमली. 

पाठोपाठ जीव खाऊन धावणारा साहेब बोम्बलताना दिसला. 

.

.

.

शेतातला वळू नाक फुरफुरवत सायबामागे धावत होता.


साहेबाचे तीन तेरी वाजले होते.कोणत्याही क्षणी वळू गाठणार आणि सायबाला शिंगावर घेणार अशी लक्षण होती.


पाटिल हातातलं काम टाकून कुंपणाकडे धावला व जीव खाऊन ओरडला....


*

*

*

सायेब ...


.


.


.


.


.


.


.आयडी.....आयडी दाखवा त्याला...😂😂😂😂😝😝😝😝😝

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा