बंड्याचे विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बंड्याचे विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दिड शहाणी बायको

 स्थळ पुणे

नवरा बायको बसमध्ये चढतात. बायको दीड तिकीट द्या.


कंडक्टर : दीड कोणाचे? बायको : माझं एक फुल आणि आमचे हे हाफ मॅड असल्याने याचं आर्ध तिकीट कंडक्टर - तरीसुद्धा तुम्हाला दोन फुल तिकीटे घ्यावी लागतील. बायको - का?

कंडक्टर - तुमचे पती हाफ मॅड म्हणून अर्ध. आणि तुम्ही दीड शहाण्या.... असे दोन फुल
😂😂😂😂😂😂😂

चिकट पुणेकर

 पुणेकर आपल्या मुलाला खुप मारत होता.



शेजारी :- का मारता आहात मुलाला ?

पुणेकर :-अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते,
हा गाढव दोन पाय-या सोडून चढला.....

शेजारी :- अहो मग मारता कश्यासाठी ? चप्पल आजून कमी झिजेल ना...

पुणेकर:- अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात....😂😂😂

Tujhya sathi kahi pan

 मुलगा :- मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे.. 😍😘



मुलगी :- आमच्या 25 लाखाच्या कर्जाला जामीनदार राहशील का??🤑🤑

.

.

.

.

मुलगा :- जातो ताई काळजी घे..😜


😂😂😂😂😂😂😂😂😂

आय डी दाखवा

 अंमली पदार्थ विरोधी पथकाचा ऑफिसर पाटलाच्या शेतात आला.

 

"तू ड्रगची अवैध शेती करतोय म्हणे. मला तपासणी करायचीय ..

त्याने गुर्मीत विचारलं..


पाटिल म्हंला.."तसं काय नाय ओ साहेब... तुमी पायजे तर तपासून बघा..पन एक करा शेताच्या त्या कोप-यात जाऊ नका".


आॅफिसर भडकून म्हणाला..."तू कोण मला सांगणार रे दिडशाण्या...माझ्या कडे ऑथोरिटी लेटर आहे"


 त्याने खिशातनं आयडी काढलं...


"बघितलं? या आयडीचा अर्थ असा की, मी पाहिजे तिथे जाउ शकतो..कुणाच्याही जमिनीत घुसू शकतो. कोणाच्या बापाची हिम्मत नाय मला अडवायची..कळलं?


 पाटलानि निमुट मान हलवली.


साहेब शेतात गेला.


थोड्याच वेळात एक मोठी किंकाळी शेतात घुमली. 

पाठोपाठ जीव खाऊन धावणारा साहेब बोम्बलताना दिसला. 

.

.

.

शेतातला वळू नाक फुरफुरवत सायबामागे धावत होता.


साहेबाचे तीन तेरी वाजले होते.कोणत्याही क्षणी वळू गाठणार आणि सायबाला शिंगावर घेणार अशी लक्षण होती.


पाटिल हातातलं काम टाकून कुंपणाकडे धावला व जीव खाऊन ओरडला....


*

*

*

सायेब ...


.


.


.


.


.


.


.आयडी.....आयडी दाखवा त्याला...😂😂😂😂😝😝😝😝😝

मनात घर करून राहणे

 एखाद्याच्या मनात कायमच

राहायचं असेल तर

त्याच्याकडून





पैसे उधार घेऊन टाका

आणि ते पैसे परत कधीच

नका दे.....

🙄🙄🤪😬🤪🤪😱😝😄😝

बायकोचे बोट

 अचानक बायकोने आपल्या नवर्‍याला बोटाने इशारा केला




आणि बोलावुन घेतले




नवरा : काय झालं का बोलावुन घेतलंस??




बायको : काम तसं काही खास नाही




फक्त माझ्या बोटात कीती Power आहे ते तपासत होते..

😇😇😂😂😆😆

परीक्षेची IPL

 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


गुरुजींनी वर्गामध्ये एक गंभीर विषय छेडला. 

  

 गुरूजी: (अतिउत्साहात) मुलांनो, सध्या 🏏T20 प्रकार खुपच फार्मात आहे. तुमच्या परीक्षा🖊 सुद्धा जर T20 सारख्या असल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल? कोणाला काही कल्पना?😇 

  

  

 पूर्ण वर्ग 🏫अचानक शांत झाला. कोणाला काहीच सुचेना.  

 ब-याच वेळानंतर बंड्याने हात👆 वर केला. बंड्या एक व्रात्य आणि खोडकर मुलगा आहे हे पूर्ण वर्गाला माहीत होते.😉 

  

 गुरूजी (नकारात्मक स्वरूपात) : हा लवकर सांग काय सांगायचे ते.🙄 

  

 बंड्या गंभीर मुद्रा करून सांगु लागला. 

  

  "गुरूजी परीक्षा १ तास २० मिनटाची असली पाहीजे."😁 

  

 गुरूजी: "ठीक आहे, पुढे?" 

  

 बंड्या: "दर २० मिनटानंतर विद्यार्थ्यांना आपापसात बोलण्याकरता २ मिनटाचा time off असला पाहीजे."😍 

  

 गुरूजी टेंशन मध्ये: "बरं पुढे?" 

  

 बंड्या: "पहिले ३० मिनिटे Power-play असला पाहिजे, ज्यात शिक्षक वर्गाबाहेर असतील."😳 

  

 गुरूजींना हल्का हल्का घाम फूटू लागला. 

  

 बंड्या: "प्रश्नपत्रिकेतील एक प्रश्न 🏏फ्री हिट असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जे काही उत्तर लिहिले असेल त्याला पूर्ण मार्क मिळाले पाहिजेत."😊 

  

 गुरूजींचे😰 कपडे घामाने ओले झाले. 

  

 बंड्या: "आणि कोणी पुरवणी घेतली की चिअर Girls नीं वर्गात येऊन २ मिनिट डांस केला पाहिजे."💃🏻💃🏻 

  

 पूर्ण वर्गात टाळ्यांचा👏 कडकडाट झाला आणि विद्यार्थी 👨🏼‍💼बंड्या ला खांद्यावर घेऊन 🕺🏻नाचू लागले.☝🏻☝🏻👏🏻👏🏻 

  

 गुरूजी कायमचे पावर प्ले मध्ये (🏫वर्गाबाहेर) गेले. 😷😂😂 


😀😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁

बंड्या आणि सर

सर - गृहपाठ का नाही केला?
मुलगा - सर लाईट गेले होते.
सर - मेणबत्ती लावायची मग..
मुलगा - काडेपेटी नव्हती.
सर - का?
मुलगा - देवघरात होती.
सर - घ्यायची मग.
मुलगा - अंघोळ नव्हती केली.
सर - का?
मुलगा - पाणी नव्हत.
सर - का?
मुलगा - मोटार चालू होत नव्हती.
सर - का?
मुलगा - आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून....