बायकोचा हेअरकट


बायकोचा हेअरकट

Read Marathi Jokes at HTTPS://manachejokes.blogspot.com



*Wife* : आहो ऐकलंत का? मी केस कापू का हो माझे..

*Husband* : काप...

*Wife* : किती कष्टाने वाढवलेत...

*Husband* : तर मग नको कापू...

*Wife* : पण हल्ली छोटे केसच छान दिसतात..

*Husband* : तर मग काप...

*Wife* : मैत्रिणी बोलतात नाही शोभणार..

*Husband* : तर मग नको कापू...

*Wife* : पण मला वाटतंय शोभतील...

*Husband* : तर मग काप..

*Wife* : पण केस कापले तर वेणी नाही घालता येणार...

*Husband* : तर मग नको कापू

*Wife* : प्रयत्न करुन बघायला काय..?

*Husband* : तर मग काप...

*Wife* : आणि बिघडले तर

*Husband* : तर मग नको कापू...

*Wife* : ठरवतेच एकदाचे कापायचेच

*Husband* : तर मग काप....

*Wife* : बिघडले तर तुम्ही जबाबदार

*Husband* : तर मग नको कापू..

*Wife* : तसे तर छोटे केस सांभाळायला बरे..

*Husband* : तर मग काप....

*Wife* : भीती वाटते ओ खराब दिसले तर...

*Husband* : तर मग नको कापू..

*Wife* : जाऊ दे काय होईल ते होईल कापतेच

*Husband* : तर मग काप...

*Wife* : बर ते जाऊदे..मी आई कडे जाऊ का थोडे दिवस?

*Husband* : तर मग नको कापू...

*Wife* : अहो मी माहेरी जायचे बोलते

*Husband* : तर मग काप...

*Wife* : तुमची तब्येत बरी आहे  ना?

*Husband* : तर मग नको कापू...

बिचारा नवरा दोन दिवस झाले आता वेड्यांच्या इस्पितळात दोनच वाक्यं बोलतोय...

तर मग काप... तर मग नको कापू...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा