पतीचे अध्यात्मिक प्रश्न

पतीचे अध्यात्मिक प्रश्न

Read Marathi jokes at HTTPS://manachejokes.blogspot.com


आज सकाळी-सकाळी माझ्या मनात थोडेसे आध्यात्मिक विचार घोंगावू लागले.
काही क्षण डोळे बंद करुन बसलो तर समोर काही प्रश्न दिसू लागले....

'कोण आहे मी?'

'कुठून आलो आहे मी?'


'का आलो मी या जगात?

'आणि कुठे जायचे आहे मला?'.....

तेवढ्यात स्वयंपाकघरातून खणखणीत आवाज कानात ऐकू आला,

"एक नंबरचे आळशी आहात तुम्ही!"

"काही समजत नाही कुठच्या दुनियेतून आला आहात मला छळायला!!"

"उठा आणि ताबडतोब आंघोळीला जा!!!"

..... अशाप्रकारे माझ्या चारही प्रश्नांची उत्तरे न मागता मिळून, मला संपूर्ण ज्ञानप्राप्ती झाली.

Read Marathi jokes at HTTPS://manachejokes.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा