विनोदी जाहिरात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विनोदी जाहिरात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मनात घर करून राहणे

 एखाद्याच्या मनात कायमच

राहायचं असेल तर

त्याच्याकडून





पैसे उधार घेऊन टाका

आणि ते पैसे परत कधीच

नका दे.....

🙄🙄🤪😬🤪🤪😱😝😄😝

लग्न _कांदेपोहे कार्यक्रम



_नोकरी मिळाल्यावर चारपाच वर्षे ट्राय करून देखील लव्ह मॅरेज जमवता येत नाही हे लक्षात आल्यावर आईवडिलांच्या इच्छेनुसार अरेंज्ड मॅरेजला राजी झालेला तो एके दिवशी आईवडिलांसह मुलगी बघायला जातो._

_वधूपिता आणि माता तिघांचे स्वागत करतात. सगळेजण दिवाणखान्यात बसतात._

_काही क्षणांनी ती कांदेपोह्यांचा ट्रे घेऊन येते. अहा! काय तिचे सौंदर्य. देवाने ज्या हातांनी माधुरी, राणी मुखर्जी आणि कतरीनाला बनवले त्याच हातांनी मध्ये ब्रेक न घेता जणू हिला बनवलं आहे._
_तो तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघतो. ती एक शालीन स्मितहास्य करते आणि त्याच्यापुढे ट्रे धरते. ट्रेमधली डिश उचलताना तिच्या अंगावरचा मंद उंची परफ्युम दरवळतो आणि त्याला पागल करतो._

_ती उजवीकडे सरकते आणि त्याच्या वडिलांसमोर ट्रे धरते. तेव्हा तिच्या शरीराची वीस अंशात वळालेली आकृती तितकीच गोडमिट्ट दिसते. वडील डिश उचलतात._

_ती आता त्याच्या आईकडे वळते. आई वडिलांशी काटकोनात बसलेली आहे._ _त्यामुळे आईपुढे झुकताना तिचा देखणा साईडव्ह्यू दिसतो._

_आता ती संपूर्ण पाठमोरी होते. कारण वधूपिता आणि मामा समोर बसले आहेत._

_तो घोगऱ्या आवाजात वडिलांच्या कानात कुजबुजतो. होकार देऊन टाकू. तुम्ही कोणतीही अट घालू नका. आईला पण सांगा._

त्याच क्षणी आतून आवाज येतो, _“आले ग मम्मी तू गेलीस का पोहे घेऊन?"_

_आणि नियोजित वधू लाजत लाजत बाहेर येते..._

_बाकि काही नाही_

संतूर साबणाची नवी जाहिरात